Wednesday 21 September 2016

शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.


शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.

 खालील भाग 1 व भाग २ व   shalarth paybill generation and forword process वर click  करावे.

भाग 1

 

भाग 2

 

shalarth paybil generation and forword proccess

 

 

 

 

 

शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.


शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.

 खालील भाग 1 व भाग २ व    shalarth paybil generation and forword proccess    वर  click करावे.

भाग 1

 

भाग 2

 

shalarth paybil generation and forword proccess

 

 

 

 

 

Monday 25 July 2016

मराठी व हिंदी परीक्षा सूट माहिती

मराठी व हिंदी परीक्षा सूट माहिती

         आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी सांगू इच्छितो की, आपले सर्व शिक्षकबांधव व  इतर कर्मचारी यांना मराठी व हिंदी परीक्षा दिल्याची किंवा सूट मिळाल्याची नोंद सेवापुस्तिकेला करणे आवश्यक असते.         माध्यमिक शालांत परीक्षा ( 10 वी) मध्ये मराठी व हिंदी हे विषय असतील तर आपणास मराठी व हिंदी परीक्षेतून सूट मिळण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयास  अर्ज सादर करावा लागेल.  त्यासाठी खालील शब्दावर क्लीक करा.

 

मराठी व हिंदी परीक्षा सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज 

Friday 15 July 2016

मराठी हिंदी परीक्षा

               

मराठी व हिंदी परीक्षा सूट माहिती

         आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी सांगू इच्छितो की, आपले सर्व शिक्षकबांधव व  इतर कर्मचारी यांना मराठी व हिंदी परीक्षा दिल्याची किंवा सूट मिळाल्याची नोंद सेवापुस्तिकेला करणे आवश्यक असते.         माध्यमिक शालांत परीक्षा ( 10 वी) मध्ये मराठी व हिंदी हे विषय असतील तर आपणास मराठी व हिंदी परीक्षेतून सूट मिळण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयास  अर्ज सादर करावा लागेल.  त्यासाठी खालील शब्दावर क्लीक करा.

मराठी व हिंदी परीक्षा सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज 




                सर्व शासकीय कर्मचार्यांना आपल्या सेवेमध्ये मराठी व हिंदी विषयाची सूट घेतल्याची नोंद सेवापुस्तीकेला घेणे बंधनकारक असते. परंतु ज्या कर्मचार्याचे दहावी परीक्षेत हिंदी विषय नसेल अश्या  कर्मचार्यांना यतदर्थ मंडळ, औरंगाबाद यांची हिंदी विषयाची परीक्षा देणे आवश्यक असते. सदर परीक्षेचे अर्ज एप्रिल आणि ऑक्टोंबर मध्ये असतात. या परीक्षेचा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासंबधीची माहिती  पाहण्यासाठी खालील परीक्षा फॉर्म व परीक्षा शुल्क या वर Click  करावे.


हिंदी परीक्षा फॉर्म



परीक्षा शुल्क चलन 


                             या परीक्षेचा फॉर्म आपल्या गटशिक्षण कार्यालयामार्फत पाठवावा लागतो. हा फॉर्म  पाठवाण्यासाठीचा पत्ता :- 
                             प्रति,
                                     विभागीय सहाय्यक भाषा संचालक,
                                     भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय,
                                     जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
                                     औरंगाबाद.  ४३१००१

   अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.
           १.  श्री. बळे गणेश महालिंग. मो.नं.  ९८८१६०१२००/ ९४२१९४५१३३
           २.  विभागीय सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, औरंगाबाद.          
                  फोन नं.   ०२४०२३६१३७२


मराठी हिंदी परीक्षा

               

मराठी व हिंदी परीक्षा सूट माहिती

         आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी सांगू इच्छितो की, आपले सर्व शिक्षकबांधव व  इतर कर्मचारी यांना मराठी व हिंदी परीक्षा दिल्याची किंवा सूट मिळाल्याची नोंद सेवापुस्तिकेला करणे आवश्यक असते.         माध्यमिक शालांत परीक्षा ( 10 वी) मध्ये मराठी व हिंदी हे विषय असतील तर आपणास मराठी व हिंदी परीक्षेतून सूट मिळण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयास  अर्ज सादर करावा लागेल.  त्यासाठी खालील शब्दावर क्लीक करा.

मराठी व हिंदी परीक्षा सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज 

 


                सर्व शासकीय कर्मचार्यांना आपल्या सेवेमध्ये मराठी व हिंदी विषयाची सूट घेतल्याची नोंद सेवापुस्तीकेला घेणे बंधनकारक असते. परंतु ज्या कर्मचार्याचे दहावी परीक्षेत हिंदी विषय नसेल अश्या  कर्मचार्यांना यतदर्थ मंडळ, औरंगाबाद यांची हिंदी विषयाची परीक्षा देणे आवश्यक असते. सदर परीक्षेचे अर्ज एप्रिल आणि ऑक्टोंबर मध्ये असतात. या परीक्षेचा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्यासंबधीची माहिती  पाहण्यासाठी खालील परीक्षा फॉर्म व परीक्षा शुल्क या वर Click  करावे.


हिंदी परीक्षा फॉर्म



परीक्षा शुल्क चलन 


                             या परीक्षेचा फॉर्म आपल्या गटशिक्षण कार्यालयामार्फत पाठवावा लागतो. हा फॉर्म  पाठवाण्यासाठीचा पत्ता :- 
                             प्रति,
                                     विभागीय सहाय्यक भाषा संचालक,
                                     भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय,
                                     जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
                                     औरंगाबाद.  ४३१००१

Tuesday 26 April 2016

Tuesday 8 March 2016

ब्लॉग कसा बनवावा

ब्लॉग कसा बनवावा

   ब्लॉग हे weblog चे लघु रुपांतर आहे.यावर आपण लेख प्रकाशित करू शकतो त्याला "ब्लॉगिंग" असे म्हणतात.जो ब्लॉगिंग करतो त्याला "ब्लॉगर" म्हणतात .
   ब्लॉग तयार करणे एकदम सोपे आहे.सर्वप्रथम www.blogger.com ही website ओपन करा.ओपन केल्यानंतर one account for all अशी tab दिसेल त्या मध्ये तुमचा e-mail id टाका.त्यानंतर password टाकून login होईल.त्यानंतर blogger dashboard ओपन होईल.तेथील creat New blog वर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर नविन tab दिसेल त्यामध्ये तुमच्या ब्लॉगचा address टाकावा लागेल .तो तुमच्या नावाचा असु शकतो.address टाकल्यानंतर तो address उपलब्ध आहे का नाही ते दिसेल.उपलब्ध असेल तर creat new blog ला क्लिक करा.उपलब्ध नसेल तर नविन address टाकावा लागेल.त्यानंतर तुमचा ब्लॉग तयार होईल आणि तो त्या ठिकाणी दिसेल.
   आता तुम्ही post तयार करा.post तयार करण्यासाठी पेन्सिल चिञावर क्लिक करा.तुमची posr तयार करा व ती publish करा.ति post तुमच्या ब्लॉगवर दिसेल.
       अशा प्रकारे तुमचा ब्लॉग तयार झाला.
     तुम्हाला याला डिझाईन करायचे असेल तर त्याची माहिती मी दिलेली आहे.



ब्लॉगसाठी Drop Down मेनू


ब्लॉगसाठी तुम्हाला Drop Down मेनू बनवणे सोपे आहे.त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.त्यावर तुम्हाला 35 वेगवेगळे Drop down मेनूसाठीचे HTML code आहेत.ते cope करून ब्लॉगवर Add html gadget मध्ये कोड पेस्ट करा.त्यातील लिंक तुमच्या ब्लॉगमधील लिंकने बदला.

drop down  मेनुसाठी येथे click करा.


ब्लॉगचा app बनवणे.

Download



Direct download link generated

    आपण ब्लॉगला वेगवेगळ्या डाउनलोड करण्याच्या लिंक देतो.लिंक देण्यासाठी google drive,drop box यावर कविता,गाणी,pdf फाईल अपलोड करतो.ब्लॉगवरील त्या लिंकला क्लिक केल्यास नविन विंडोमध्ये google drive/drop box ओपन होते.त्यानंतर क्लिक केल्यास डाउनलोड सुरु होते.पण आता direct download link तयार करु शकतो.त्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या google drive/drop box वरील लिंक copy करून Text box मध्ये पेस्ट करा व generate वर क्लिक करा.नविन लिंक तुम्हाला मिळेल .ती copy करून ब्लॉगला द्या .आता लिंकला क्लिक केल्यास नविन window न उघडता डाउनलोड सुरु होईल.कुणालाच डाउनलोडची अडचण येणार नाही.

Direct download link generate

Friday 4 March 2016

वर्णनात्मक नोंदी

अकारिक मूल्यमापनाच्या नोंदी डाऊनलोड करण्यासाठी खालिल इयत्तेवर  click करा.

पहिली

दुसरी

तिसरी 


चौथी


पाचवी

Sunday 24 January 2016

इयत्ता दुसरी ते पाचवी च्या सर्व विषयाची PDF पुस्तके


इयत्ता दुसरी ते पाचवी च्या सर्व विषयाची  PDF  पुस्तके 


इयत्ता दुसरी
मराठी  
ENGLISH 

इयत्ता  तिसरी

ENGLISH 
परिसर अभ्यास

इयत्ता   चौथी
ENGLISH 
परिसर अभ्यास  १
परिसर अभ्यास  २ 

इयत्ता  पाचवी
मराठी 
ENGLISH 
हिंदी
गणित 
परिसर अभ्यास  २
इयत्ता तिसरी चे परिसर अभ्यास  विषयाचे पुस्तक मिळवण्यासाठी  येथे click  करा . 

ध्वजसंहिता

ध्वजसंहीतेच्या संपूर्ण माहितीसाठी www.ganeshbale.blogspot.in येथे क्लिक करा 



                                                     ध्वजसंहिता
1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.
2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.
3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)
4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.
ध्वजप्रतिज्ञा
"मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."

ध्वजारोहन क्रम
1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
2) राष्ट्रीय सलामी
3) राष्ट्रगीत
4) ध्वजप्रतिज्ञा
5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.
*****!!!!!*****‬: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.
राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.
ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.
संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.
मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.
ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.
राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.
शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.
रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.
प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.
ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.
ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.
राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.
अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.
कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.
ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.
संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.
जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.
कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.
इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.
केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.
तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.
ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.
ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.
त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.
ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.
कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.
तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.
राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.
ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.
राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.
शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

Saturday 23 January 2016


  • इयत्ता  ३ री ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे समान उच्चाराचे शब्द संच 



--•●English उच्चारसाधर्म्य शब्द •●--
1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे
2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त
3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे
4) celler - तळघर
seller -विक्रेता
5) once - एकदा
one's - एखाद्याचा
6) sit - बसणे
seat - आसन
7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे
8) test - चाचणी
taste - चव
9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा
10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता
11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन
12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला
13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे
14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास
15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे
16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)
17)meat - मटण
meet - भेटणे
18)leave - सोडणे
live - राहणे
19)piece - तुकडा
peace - शांतता
20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक
21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य
22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा
23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर
24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल
25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी
26) deed - कृत्य
did - केले
27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप
28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे
29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल
30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन
31) fell - पडणे
fail - नापास
32) story - गोष्ट
storey- मजला
33) slip - घसरणे
sleep - झोपणे
34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे
35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी
36)hit - टोला मारणे
heat - उष्णता
37) of - चा, ची चे
off - बंद करणे
38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ
39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी
40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे
41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य
42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे
43) deed - कृत्य
did - केले
44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत
45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)
46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो
47) liver - यकृत
lever - तरफ
48) tent - तंबू
taint - कलंक , दोष
49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड
50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे
51) list - यादी
least - कमीत कमी, किमान
52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,
53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही
54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती
55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन
56) lip - ओठ
leap - उडी मारणे
57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा
58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य
59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण
60) root - मूळ
route - मार्ग
61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख
62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे
63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे
64) night - रात्र
knight - सरदार
65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा
66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)
67) male - पुरूष
mail - टपाल, कवच
68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे
69) let - परवानगी देणे
late - उशीर
70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट
71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)
72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर
73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग
74) thirst - तहान
thrust - खुपसणे
75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध
76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप
77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल
78) it - तो, ती ते
eat - खाणे
79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा
80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे
81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा
82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष
83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी
84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात
85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला
86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे
87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे
88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे
89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक
90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान
91) not - नाही
knot - गाठ
92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन
93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा
94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय
95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग
96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण
97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल
98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी
99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण
100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ
101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त  दिलेली  मेजवाणी, विवाहोत्सव
   bridle - ब्राईडल - घोड्याचा  लगाम
102) price - प्राईस - किंमत
     prize - प्राईझ - बक्षिस
103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या  टोकाचा  भाग
    tow - टो - साखळीने  ओढणे
104)rest - रेस्ट - आराम
   wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे
105)men - मेन - माणसे 
   main - मेन - मुख्य 
   mane - मेन - आयाळ, मानेवरील  केस
106) desert - वाळवंट, ओसाड  प्रदेश
    dessert - जेवणानंतरचा  फलाहार, मिष्टान्न
107) counsel - उपदेश, सल्ला
     council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ
108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका
    coarse - जाडेभरडे
109) duel - द्वंद्वयुद्ध
    dual - दुहेरी, संयुक्त
110) bell - बेल, घंटा
    belle  - सुंदर तरूणी
    bale - गठ्ठा
    bail - जामीन, क्रिकेट खेळातील  स्टंपवरील  बेल
111) grin - दात  काढून  हसणे, दात  विचकणे
  green - हिरवा
112) shed - छप्पर
     shade - सावली, छाया
113) illegible - वाचण्यास  अवघड
    eligible - पात्र, लायक
114) canon - चर्चने केलेला  कायदा
    cannon - तोफ (जुन्या  प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे
115) corps - लष्करी  तुकडी
     corpse - प्रेत
116) hart - हार्ट - हरण( नर)
    heart - हार्ट - हृदय
    hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा
117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी
    personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा  कारखान्यातील  कर्मचारी वर्ग
118) fever -  फिव्हर - ताप, ज्वर
    favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव
119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद
    deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान
120)physic - फिझिक - औषध
   physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी
121)umpire - अम्पायर - पंच
    empire - एम्पायर - साम्राज्य
122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी
    voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी
123) am - आहे
    yam - रताळे
   
124) don - सभ्य  गृहस्थ
    dawn - पहाट
125) role - रोल - भूमिका
    roll  - रोल - गुंडाळणे
126) pip - पिप - संत्री मौसंबी  सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची  ठिपका, फाशांवरील  ठिपका
  peep - पीप - डोकावून  पाहणे
127) nice - नाईस - छान
    niece - नीस - भाची , पुतणी
128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील  केस
    fir - फर - देवदार  वृक्ष
129) hill - हिल - टेकडी
    heel - हील -  टाच
    heal - हील - जखम  भरून  आणणे, रोगमुक्त करणे
130) be - बी  - असणे , होणे, घडणे
    bee - बी - मधमाशी
131) eight - एट - आठ
    ate - एट- खाल्ले ( eat चे  भूतकाळी रूप)
    yet - येट - अद्यापपर्यंत
132) each - ईच - प्रत्येक
     itch - इच - खाज, खरूज
     etch - एच - कोरणे
133) fist - फिस्ट - मूठ
    feast - फीस्ट - मेजवाणी
134) pull - पुल - ओढणे, खेचणे
    pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह
135) sick - सिक - आजारी
     seek - सीक - शोधणे, सापडविणे
  
136) which - विच - कोणता?  कोणती?  कोणते?
    witch - विच - चेटकीण, जादुगारीण
137) met - मेट - भेटला
     mate - मेट - मित्र, सोबती, मात  करणे
138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज
    deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे
139) skim - स्किम - मलम  लावणे, द्रवाच्या पृष्ठभागावरून वरच्यावर वर  काढून  घेणे.
  scheme - स्कीम - युक्ती, योजना, पद्धतशीर रचना
140) lid - लिड -झाकण, झाकणे, डोळ्याची  पापणी
    lead - लीड - आघाडी, नेतृत्व करणे
    lead - लेड - शिसे 
141) ege - एज - वय
    edge - एज - काठ , किनारा, कडा, धार, तीक्ष्ण बाजू
142)  gem - जेम  - रत्न
     game - गेम  - खेळ
143) tins - टिन्स - कथीलने कल्हई केलेले  पत्र्याचे  डबे 
   teens - टीन्स - १३ ते १९ हे  अंक, १३ ते १९ दरम्यानच्या  वयाचा
144) soul - सोल - आत्मा, जीव, चैतन्य, तत्त्व
    sole - सोल - पाऊल, पायमोजा व  बूट यांचा  तळवा, एकुलता एक
    sol - सोल - सूर्य (ग्रीक नाव) (काव्यप्रकारात  वापर)
145) rote - रोट - घोकंपट्टी करणे, पाठ करणे
    rota - रोट - पाळीपाळीने करावयाच्या  कामाची  यादी 
   wrote - रोट - लिहिले  (write चे  भूतकाळी रूप)

Tuesday 12 January 2016

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गंधोरा  ता तुळजापुर  येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. त्यासाठी भेट दया. www.ganeshbale.blogspot.in


Sunday 10 January 2016

नमस्कार मित्रांनो 
  इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना Multiplication Tables  शिकवण्यासाठी उपयोगी पडणारा Video

My First Post

नमस्कार मित्रानो ……. 
                         माझ्या ब्लॉगमध्ये  आपले सहर्ष स्वागत करीत आहे . www.ganeshbale.blogspot.in 


गणेश महालिंग बळे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंधोरा
ता. तुळजापूर जि . उस्मानाबाद .
मो . क्र . ९८८१६०१२०० / ९४२१९४५१३३

शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.

शालार्थ प्रणालीमध्ये पगार बिल तयार करणे.   खालील भाग 1 व भाग २ व   shalarth paybill generation and forword process वर click  करावे. ...